मुधोजी महाविद्यालयात एम कॉम व एम एससी चे वर्ग सुरू

फलटण दि.9 ( फलटण टुडे ) :
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.महाविद्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावास शिवाजी विद्यापीठा ने मान्यता देऊन महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला होता त्या प्रस्तावास नुकतीच महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे.

 फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शना नुसार महाविद्यालयाने सदरची सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला व त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2022- 23 पासून एम. कॉम व एम. एससी केमिस्ट्री या पदव्युत्तर वर्गांसाठी प्रवेश दिले जाणार आहेत.

तात्काळ महाराष्ट्र शासन व शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वा प्रमाणे गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मुधोजी महाविद्यालयाने एम.कॉम व एम एससी केमिस्ट्री साठी सुसज्ज संदर्भ ग्रंथांनी युक्त ग्रंथालय ,तसेच सुसज्ज प्रयोगशाळा उभारलेली असून अनुभवी व पात्र प्राध्यापक वृंद असलेले महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेची सूचीअल्पावधीतच जाहीर करणार आहे. 

तरी बी. कॉम व बी.एससी च्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी सदरच्या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ . कदम. पी. एच यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!