*गोजूबावी पालखी महामार्गावरील मनोरूग्णास शिवॠण ऋषभ प्रतिष्ठान यांच्या कडे सुपूर्त*

 गोखळी (फलटण टुडे वृत्तसेवा ) (राजेंद्र भागवत): 

बारामती तालुक्यातील जाणाऱ्या पालखी मार्गावर गेली पंधरा दिवसांपूर्वी गोखळी येथील राजू गावडे पाटील यांना एक मनोरूग्ण रस्त्याच्या कडेला आढळून आला आसपास चौकशी केली असता गेल्या पंधरवड्यापासून असल्याचे समजले संबंधित मनोरुग्णास सेवाभावी संस्थेच्या स्वाधीन करण्यासाठी राजू गावडे पाटील(गोखळी) यांनी विविध सेवाभावी संस्थेशी संपर्क सुरू केला.गोखळी ता.फलटण.येथील रमेश गावडे (सवई ) यांना संबंधित घटनेची कल्पना दिली रमेश गावडे सवई यांनी जेवण डबा घेऊन संबंधित मनोरूग्णास जेवू घातले व दररोज स्वतः च्या चारचाकी वाहनाने जावून संबंधित मनोरुग्णास जेवण संबंधित संस्थेने कडे सुपूर्त करण्यात येईपर्यंत जागेवर जावून देवू घातले या  आढळून आलेल्या एका मनोरुगणास शनिवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी जुन्नर तालुका जिल्हा पुणे येथील शिवॠण ऋषभ प्रतिष्ठान कडे रीतसर सुपूर्त करण्यात आले. यावेळी बारामती पोलीस निरीक्षक महेश ढवाण गोजूबवी पोलिस पाटील अशोक आटोळे, सावंतवाडी चे पोलिस पाटील नितीन गटकळ, रमेश गावडे ( सवई ),राजू गावडे पाटील, रणजित खोमणे (  कोर्हाळे ता बारामती) यांचे सहकार्याने या मनोरुगणास प्रतिष्ठान कडे सुपूर्द करण्यात आले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!