फलटण (फलटण टुडे वृत्तसेवा ):
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असलेचे पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागृत राहाव्यात , या स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात अज्ञात क्रांतीकारकाच्या कार्याची प्रेरणा जनमानसात निर्माण व्हावी यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष निमित्त हर घर झेंडा उपक्रमात तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे , असे आवाहन उपाविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी केले आहे.
९ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम राबविणेत येणार आहेत .त्या अनुषंगाने फलटण तालुकेमध्ये दि. १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधी मध्ये प्रत्येकाचे घरावर, शासकिय कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकेल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताहर घर झेंडाव इतर उपक्रम राबविणे बाबतच्या तयारीसाठीची बैठक तहसील कार्यलय फलटण येथे आयोजित करणेत आली होती. यावेळी उपाविभागीय अधिकारी शिवाजी जगताप बोलत होते. सदर बैठकीला तहसीलदार फलटण समीर यादव, उपाविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, गट विकास अधिकारी अमिता गावडे, मुख्याधिकारी संजय गायकवाड व विविध विभागाचे विभाग प्रमुख, महाविदयालयीन प्राचार्य उपस्थित होते.
तालुक्यातील प्रत्येक शासकिय, निमशासकिय कार्यालय, खाजगी आस्थापना, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था यांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग घेऊन आपल्या कार्यालयावर तिरंगा झेंडा लावणे बरोबर ध्वजसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रत्येक नागरिकाचे घरावर तिरंगा झेंडा लावणेसाठी त्यांचेमध्ये जागृती व्हावी यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी विशेष प्रयत्न करावेजतसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने पुरेशा राष्ट्रध्वजाचा पुरवठा करावा, असे आवाहन उपाविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी केले आहे.
तसेच सदर कालावधी मध्ये तालुकेतील प्रत्येक शासकिय , निमशासकिय कार्यालय मध्ये स्वच्छता करणेत यावी, वृक्षलागवड करणेत यावे. शालेय / महाविदयालय स्तरावरून विविध स्पर्धा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे. तालुकेतील प्रत्येक शासकिय कार्यालयावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी लोगो लावावा . ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे. अशा सूचना उपस्थित सर्व विभाग प्रमुख यांना उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिल्या. फलटण तालुकेमध्ये स्वराज्य महोत्सव उपक्रमामध्ये जास्तीतजास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन यावेळी तहसीलदार फलटण समीर यादव यांनी केले.