फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील मौजे गोखळी ग्रामपंचायतचे सरपंच सौ सुमन हरिभाऊ गावडे (सवई) यांना नवभारत वृत्तपत्र समूहाचे दैनिक नवराष्ट्र ने आदर्श महिला सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित केले.
*आज बारामती येथे नवभारत वृत्तपत्र समूहाचे दैनिक नवराष्ट्र यांनी बारामती.भोर.इंदापूर. पुरंदर.फलटण तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंचांना आमदार दत्तात्रय मामा भरणे (मा.राज्यमंत्री) व बारामती ॲग्रो ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र (दादा) पवार यांच्या हस्ते सरपंचांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.*
*यावेळी गोखळी गावच्या सरपंच सौ सुमन हरिभाऊ गावडे (सवई) यांच्या आज पर्यंतच्या कार्यकालामध्ये गावच्या विकास कामाबरोबरच अचानक उद्भवलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आदर्श कामाची दखल घेऊन त्यांना आदर्श महिला सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष विद्यमान उपसरपंच सागर गावडे (पाटील) तसेच ग्रामपंचायत सदस्य. उपस्थित होते.*