बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ) :-
पुणे जिल्हा परिषद मध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा कला शिक्षक संघ आयोजित *बारामती व इंदापूर तालुकास्तरीय कला शिक्षक कार्यशाळा* नुकतीच सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अतिशय उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेचे उदघाट्न कला शिक्षक संघाचे *राज्य उपाध्यक्ष मा. किरण सरोदे, इतर पदाधिकारी यांचे शुभहस्ते* पार पडले. सर्व पाहुण्यांचे यथोचित स्वागत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सागर आटोळे सर व इतर पदाधिकाऱ्यांनी केले. या कार्यशाळेमध्ये कला शिक्षकांना ग्रेड परीक्षा, फलक लेखन, कला अभ्यासक्रमाविषयी मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. *सदर कार्यशाळेसाठी पुणे जिल्हा कला शिक्षक संघांचे अध्यक्ष मिलिंद शेलार, विभागीय उपाध्यक्ष नितीन गायकवाड, कार्याध्यक्ष हेमंत नागवडे, जिल्हा सचिव वाहिद खान, अमीन मुल्ला, सचिन कदम, मिलिंद शेलार, संजय भोईटे, अविनाश कुंभार, अतुल गायकवाड यांच्यासह संस्थेचे सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे, सी. ई. ओ. प्रा. जायपत्रे सर, विभागीय प्रमुख वणवे सर, प्राचार्य दत्तात्रय शिंदे, निलिमा देवकाते, स्वप्नाली दिवेकर, राधा नाळे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम सावंत व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे यांनी केले.