फलटण ( फलटण टुडे वृत्तसेवा ) :
मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक 29 व 30 जुलै 2022 रोजी संपन्न झालेल्या पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेला कनिष्ठ विभागातील इयत्ता बारावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध खेळात सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये खो-खो, हाप पीच क्रिकेट,100 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 100× 4 रिले धावणे, गोळा फेक या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. खो-खो मध्ये बारावी कला शाखेच्या मुले व मुलींचा संघ विजेता ठरला. हापपीच क्रिकेटमध्ये विज्ञान शाखेच्या मुलांचा संघ विजेता तर कला शाखेच्या मुलांचा संघ उपविजेता ठरला.100 मीटर धावणे यामध्ये प्रथम क्रमांक श्री बापूराव तरडे व मुलींमध्ये कु.राऊत पूजा यांनी मिळवला. 400 मीटर धावण्यात श्री बापूराव तरडे व कु. रसिका मोहिते यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 100×4 रिले ( धावने ) स्पर्धेत प्रथम क्रमांक कला शाखेतील मुला – मुलींच्या संघाने पटकाविला तर द्वितीय क्रमांक विज्ञान शाखेतील मुला-मुलींच्या संघाने पटकावला. गोळा फेक या क्रीडा प्रकारात श्री गणेश काशीद व कु. रसिका मोहिते यांनी प्रथम क्रमांक मिळवला .
या स्पर्धेला पंच म्हणून श्री सत्यजित निंबाळकर, श्री सुहास कदम, श्री अविनाश गंगतिरे व श्री राजकुमार मोहिते यांनी तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रा. रणधीर मोरे व प्रा. अभिजित शिंदे यांनी काम पाहिले.
पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम व कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. एस. आर. वेदपाठक यांनी कनिष्ठ विभाग जिमखाना प्रमुख प्रा. टी. एम. शेंडगे, सर्व खेळ समन्वयक प्राध्यापक व प्राध्यापिका यांचे खेळाडूंना मार्गदर्शन केल्याबद्दल व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपले सक्रिय योगदान दिल्याबद्दल आभार मानले. तसेच यशस्वी व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले.