गोखळी ( फलटण टुडे वृत्तसेवा ):
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे पारंपरिक पद्धतीने श्रीयाळ षष्ठी साजरी करण्यात आली.’औट घटकेचा राजा’चा उत्सव . प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही फेर धरून गाणी, झिम्मा फुगडी थाटामाटात साजरा करण्याकरता महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गोखळी ता. फलटण येथील पाटील घराण्याकडे श्री.तानाजी गोपीनाथ गावडे घराण्याकडे मान आहे. तसेच सार्वजनिक श्रियाळ शेठ उत्सव मंडळाचे वतीने नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी उत्सव साजरा होत असतो. कुंभार समाजातील जनार्धन वामन कुंभार ‘श्रियाळ शेठ’ राजाची प्रतिमा तयार करतात .या प्रतिमेला खपली, डाळ ,करडई आदी कडधान्य लावले जातात.मूर्ती पुजन करण्यात आल्या नंतर दर्शनासाठी महिलांनी व भाविकांनी मोठी गर्दी केली होती..इ.स.वी.सन १३९६ ते १४०८ याकाळात पर्जन्यमान कमी झाल्याने दख्खन प्रदेशात बारा वर्षे दुष्काळ पडला होता. या दुष्काळास दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणून ओळखले जाते.विजापूरच्या आदिलशाही मध्ये अराजक माजले होते.अन्नपाण्यावाचून लोक मृत्युमुखी पडत होते.रयत गाव सोडून परागंदा होत होती.यावेळी शिवभक्त श्रीयाळ शेठ या सावकाराने रयतेच्या यातना पाहून आपली सारी संपत्ती आणि धान्य कोठार मुक्त केले.याची ही दानशूर वृत्ती पाहून आदिलशहाने त्याला एक दिवसासाठी राजा केले. , दुष्काळाने हैराण झालेल्या जनतेच्या चेहर्यावर आनंद पाहून श्रीयाळ शेठ राजाला खुप आनंद झाला. आनंदाच्या भरातच हर्षोल्हासाने औट घटकेतच मृत्यू पावला पण या औट घटकेत रयतेच्या हिताची अनेक कामे केली.तो दिवस होता श्रावण शुद्ध षष्ठी म्हणून आजही तो दिवस श्रीयाळ षष्ठी म्हणून ओळखला जातो. फक्त दिड दिवस त्यांचा राज्य कारभार झाला.तेव्हापासुन ‘श्रीयाळ शेठ राजाला, औट घटकेला राजा’ म्हणतात. ही म्हण अस्तित्वात आली.ऐन दुष्काळात केलेल्या मदतीच्या ऋणातुन उतरायी महिला परंपरागत पद्धतीने महिला श्रियाळ शेठ राजाचा उत्सव पंचमीच्या उत्सवात ‘श्रीयाळ षष्ठी’ साजरी केली जाते.हा उत्सव महिला वर्ग मोठ्या उत्साहाने पंचमीची फेर धरून गाणी, झिम्मा, फुगडी खेळ खेळले जातात. ” श्रीयाळ शेठ महाराज की जय”जय घोषात श्रीयाळ शेठ उत्सव प्रतिवर्षी प्रमाणे साजरा करण्यात आला.