फलटण : फलटण टुडे वृत्तसेवा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारंडेवस्ती (मलवडी) केंद्र- बिबी शाळेने आतापर्यंत १०० वृक्ष लागवडीचा व वृक्ष संवर्धनाचा टप्पा पूर्ण करणे हे कौतुकास्पद बाब असल्याचे सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र बिचुकले(M.S) यांनी गौरव उद्धार काढले.
या वर्षी उन्हाळ्यामध्ये सर्वांनीच तापमान वाढीचा उच्चांक अनुभवला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचे आपणास दिसून आले.त्यामध्येच मा. ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य) व
मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर( मा.अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा) यांनी केलेल्या आहावनानुसार संपूर्ण जिल्ह्यातच वृक्ष लागवडीचा अत्यंत स्तुत असा उपक्रम राबवला जात आहे. वाढदिवसाला बुके ऐवजी रूप भेट अशा उपक्रमाचा सर्वजण आदर्श घेत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारंडेवस्ती या ठिकाणी आतापर्यंत वड, पिंपळ, लिंब, करंज, चिंच, जांभळ, आंबा, पेरू ,चिकू, रामफळ, सिताफळ इत्यादी विविध प्रकारचे झाडे शाळेमध्ये लावली असून ती सध्या सुस्थितीत आहेत.ही सर्व झाडे डॉ. रवींद्र बिचुकले यांनी उपलब्ध करून दिली आहेत. त्याचप्रमाणे शालेय आवारात विविध प्रकारची फुलझाडे ही लावण्यात आलेली आहेत. परसबागेमध्ये वांगी, टोमॅटो ,मिरची इत्यादीची लागवड केलेली आहे. वृक्ष लागवड करताना कारंडेवस्तीचे ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, माजी विद्यार्थी,शाळेतील विद्यार्थी, शिक्षणप्रेमी या सर्वांचे सहकार्य मिळालेले दिसून येते. या उपक्रमाबद्दल केंद्रप्रमुख श्री.दारासिंग निकाळजे साहेब यांनी मुख्याध्यापक श्री.मोहन बोबडे व उपशिक्षक श्री. गणेश तांबे व सर्व विद्यार्थी यांचे कौतुक केले त्याचप्रमाणे झाडाचे संवर्धन चांगल्या प्रकारे कसे करायचे याबद्दल माहिती दिली.