फलटण : फलटण टुडे वृत्तसेवा
जिद्द , आत्मविश्वास, चिकाटी याचेच दुसरे नाव म्हणजे ऋषीकेश बाळकृष्ण मोरे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अपंगात्वर मात करून जगणं कसं असतं,आणि तेही हसत हसत विना तक्रार आयुष्य सुंदर कसे बनवायचे हे ऋषीकेश कडे पाहून शिकावं . आमचे परममित्र श्री.बाळकृष्ण मोरे या प्राथमिक शिक्षकाचा हा मुलगा. वडिल आपल्या कुटुंबासाठी काय करु शकतात याचे ज्वलंत उदाहरण .दिवसभर प्रामाणिकपणे विदयार्थांना शाळेत शिकवायचं आणि संध्याकाळी आपल्या कुटुंबासाठी भाजी मंडई विकायची. घरी आल्यावर मुलांचा अभ्यास, शाळेची तयारी , सकाळी -सकाळी पुन्हा भाजी मंडई खरेदी करण्याची लगभग.. आणि नंतर शाळेत वेळेवरच उपस्थित .असे हे व्यक्तीमत्व आणि हे सर्व करू जाणे मोरे गुरुजी यांनी. एका शिक्षकाची मुले M. B. B. S. शिक्षण घेत आहेत. याही मुलाला डॉक्टर बनविण्याची तीव्र इच्छा. चेहऱ्यावर सतत हास्य. चिंता हा शब्द त्यांना माहित नाही. ऋषीकेशला अपंग विदयार्थांच्या शाळेत न पाठवता जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवले. एका आदर्श शिक्षकाचा ऋषी मुलगा, त्याला खूप मोठं व्हायचं आहे. आणि त्याचे स्वप्न ही तसेच आहे. खरं तर ऋषीकेशला भेटण्याचा योग फलटण तालुका शिक्षक समिती परिवाराला एक -दोन वेळा आला त्याचा सत्कार करण्याच्या रूपाने आला. पण आज निमित्त होते,
चि. ऋषीकेश बाळकृष्ण मोरे याने
नुकताच झी मराठीवर त्यांचा गाण्यांचा अल्बम प्रसिद्ध झाला आहे काल नांदेड येथे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वासाठी दिला जाणारा डॉ.प्रज्ञा नितीन जोशी कॄतज्ञता सन्मान पुरस्कार ॠषिकेशला प्राप्त झाला आहे.
ॠषिकेशला पुढील जीवनात आणखी यश मिळो. त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल फलटण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आज सत्कार करण्यात आला. यावेळी
सातारा जिल्हा शिक्षक समितीचे उपाध्यक्ष
श्री. सुरेंद्रकुमार घाडगे तालुका अध्यक्ष श्री.भगवंतराव कदम सरचिटणीस श्री. गणेश तांबे शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन श्री.सोमनाथ लोखंडे जिल्हा सहसंपर्कप्रमुख श्री.धन्यकुमार तारळकर जिल्हा सहसचिव श्री.तानाजी वाघमोडे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.राजेंद्र पवार कोषाध्यक्ष श्री.राजेंद्रप्रसाद निकाळजे जिल्हा संघटक श्री.रामचंद्र बागल, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. तानाजी सस्ते
प्रसिद्ध प्रमुख श्री.निलेश कर्वे युवा नेतृत्व खंडेराव काळे
सुहास ढेकळे परमेश्वर कांबळे तसेच,बाळकृष्ण मोरे,
विजय रिटे सुनील डावखर ऋषिकेश मोरे
इत्यादी शिक्षक मित्रपरिवार उपस्थित होता.