बारामती : फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती तालुक्यातील ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कूल सावळ मधील इयत्ता 1ली व 6वी मध्ये शिकणारे विद्यार्थी हर्ष श्रीरंग जमदाडे (1ली ) व श्रेया रणजित गोरे (6वी )ह्यांनी बारामती स्पीड स्केटिंग कॉम्पिटिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या अजित पवार ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित स्केटिंग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल* मिळवून ज्ञानसागरच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला.
तसेच सदर स्पर्धेमध्ये उत्तुंग यश संपादन केल्यामुळे संस्थचे अध्यक्ष सागर आटोळे यांनी सुद्धा हर्ष व श्रेयाला यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे ,दिपक सांगळे, पल्लवी सांगळे, दिपक बिबे, सीईओ संपत जायपात्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, निलिमा देवकाते,स्वप्नाली दिवेकर, राधा नाळे आदी उपस्तित होते