मुधोजी हायस्कूल येथे शिक्षण परिषद संपन्न

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था [DIET] फलटण यांच्या मार्फत मुधोजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज , फलटण येथे शिक्षण परिषद संपन्न

शिक्षण परिषेदेत उपस्थितांन मार्गदर्शन करताना कर्वे सर
फलटण दि. 30 ( फलटण टुडे वृत्तसेवा ) :
 जुलै 2022 वार शनिवार रोजी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे माहे जुलै शिक्षण परिषद घेण्यात आली सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत ही पार पडली मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण व मालोजीराज शेती शाळा फलटण या दोन शाळेतील शिक्षकांनी सहभाग घेतला.

शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक नितीन जगताप यांनी केले. NAS सर्वेक्षण विश्लेषण 2021 पवार सर यांनी माहिती दिली.अध्ययन निय्यत्ती मूलनिहाय नियोजन याचीमाहिती शामराव आटपाडकर सर यांनी दिली. शैक्षणिक पालक सभा याबद्दल निंबाळकर मॅडम यांनी माहिती सादर केली .

चार अध्ययन वर आधारित व्हिडिओ निर्मिती उपक्रम सादर केला . तसेच वरील विषयावर आधारित आढावा व नियोजन माहिती व पुढील दिश याची माहिती श्री कर्वे सर यांनी संगणकाच्या सहाय्याने दिली. तसेच त्यांनी स्वतः बनवलेला जो प्रोग्रॅम या ठिकाणी सादर केल या बद्दल शाळा त्यांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले तसेच यावेळी व्यवस्थापन समिती याची माहिती काकडे सर यांनी दिली.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणच्या मुख्य अधिकारी कुंभार मॅडम यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले.संकलन मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, श्रीमंत मालोजीराजे शेतीशाला फलटण चे मुख्याधापक ,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांनी या प्रशिक्षणास हजेरी लावली .यावेळी मुधोजी हायस्कूलचे मुख्याधापक श्री. गंगवणे सर व सकाळ विभागाचे पर्यवेक्षक श्री. काळे सर यांनी उपस्थित शिक्षकांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणच्या मुख्य अधिकारी कुंभार मॅडम मुधोजी हायस्कूलचे मुख्याधापक श्री. गंगवणे सर , श्रीमंत मालोजीराजे शेती शाळा फलटण चे उपमुख्याध्यापक श्री शेडगे सर , व अहिवळे सर , मुधोजी हायस्कूल सकाळ विभागाचे पर्यवेक्षक श्री. काळे सर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री माणिकराव सोनवलकर सर , माजी जिल्हा परिषद सदस्या सोनवलकर मॅडम इत्यादी मान्यवर व शिक्षक उपस्थित होते . यावेळी श्री. काकडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!