बारामती ( फलटण टुडे वृत्तसेवा ) :
दुर्गभ्रमंती फौंडेशन व अविनाश बांदल मित्र परिवार यांच्या वतीने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त मोफत कॉम्प्युटरवर नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
या मध्ये 728 गरजू नागरिकांनी सहभाग घेऊन तपासणी केली व यामधील 60 जणांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी बुधरानी रुग्णालय येथे पाठवले जाणार आहे.
या प्रसंगी शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, युवक चे अध्यक्ष अमर धुमाळ,संजय गांधी निराधार योजनेचे मा अध्यक्ष किरण तावरे व बारामती सहकारी बँकेचे मा. चेअरमन अविनाश लगड , बारामती फेडरेशन चे अध्यक्ष तानाजी करचे
बारामती पंचाय समितीचे माजी गटनेते दीपक मलगुंडे, बारामती सहकारी दुध संघाचे संचालक सतीश तावरे, संभाजी ब्रिगेडचे कोषाद्यक्ष अमोल काटे ,खरेदी विक्री संघाचे संचालक रवींद्र माने, बिल्डर असोसिएशनचे सदस्य मनोज पोतेकर,राजेंद्र खराडे बारामती पंचाय समितेचे सदस्य प्रदीप धापटे, शारदाताई खराडे ,नगरसेविका नीलिमा ताई मलगुंडे,बा.न.प उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, नगरसेवक अतुल बालगुडे,राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सत्यवान शितोळे, दत्तात्रय माने बाळासाहेब पाटील मुकुंद करे, नवनाथ मलगुंडे,प्रताप पागळे,हारून शेख, व इतर मान्यवर उपस्तित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशन च्या वतीने अविनाश बांदल यांनी केले
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी के के बुधरानी हॉस्पिटलचे मंजुर शेख व सहकारी, दुर्गभ्रमंती सोशल फॉउंडेशन चे सर्व सदस्य व अविनाश बांदल मित्र परिवाराचे सहकार्य लाभले
तानाजी बांदल यांनी सर्वांचे आभार मानले.