फलटण दि २८ (फलटण टुडे वृत्तसेवा )
फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापिठ, राहुरी मान्यताप्राप्त कृषि
महाविद्यालय,फलटण येथे महाविद्यालयाचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला दि. २७
जुलै २००९ रोजी महात्मा फुले कृषी विद्यापिठ, राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय, फलटण स्थापन करण्यात
आले. कृषि महाविद्यालय, फलटण स्थापन करतेवेळी महाविद्यालयाला ६० विद्यार्थ्यांची बी.एस.सी. (ॲग्री)
अभ्यासक्रमाची तुकडी सुरु करण्यात आली. कृषि महाविद्यालय, फलटण हे महात्मा फुले कृषी विद्यापिठ, राहुरी
सलग्नित उत्कृष्ट आणि पश्चिम महाराष्ट्रात कृषी शिक्षणासाठी नामांकित आणि अग्रगण्य कृषि महाविद्यालय
म्हणून नावारुपाला आलेले आहे. सद्या परीस्थीतीत महाविद्यालयांमध्ये १२० विद्यार्थ्यांची बी. एस. सी . (ॲग्री) .
(हॉनर्स) या व्यावसायिक कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अध्यापन घेत आहेत.
कृषि महाविद्यालय, फलटण अंतर्गत चार वर्षाचा बी. एस. सी . (ॲग्री) (हॉनर्स) व्यावसायिक कृषि शिक्षण
अभ्यासक्रम, मुक्त कृषि शिक्षण अभ्यासक्रम, मॅनेज, हैद्राबाद पुरस्कृत देसी अभ्यासक्रम, मृदा व पाणी चाचणी
प्रयोगशाळा, पॉलीहाऊस व शेडनेट अंतर्गत रोपवाटिका लागवड तंत्रज्ञान, काढणी पश्चात तंत्रज्ञान, गांडुळ शेती
प्रकल्प,दशपर्णी अर्क व सेंद्रिय शेती तंत्रज्ञान, बीज उत्पादन तंत्रज्ञान, मधुमक्षिका पालन, शेतकरी प्रशिक्षण व
शेतकरी शेतीशाळा कार्यक्रम असे विविध कृषि आधारीत प्रकल्प व शेतकरी भिमुख कार्यक्रमाचे आयोजन
आणि आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर विस्तार करण्यासाठी कृषि महाविद्यालय, फलटण महत्वाची
भुमिका पार पाडत आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परीषदेचे सभापती मा. ना. श्रीमंत
रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, जिल्हा परिषद साताराचे माजी
अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे सेक्रेटरी मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी
उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निबांळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे
प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, अधिक्षक श्री श्रीकांत फडतरे यांनी कृषि महाविद्यालयाच्या १३ व्या
वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कृषि महाविद्यालय, फलटणच्या १३ व्या वर्धापन दिन प्रसंगी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय
व कृषि महाविद्यालय, फलटण येथिल सर्व विभागातील प्राध्यापक वृंद व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सदरील प्रसंगी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटणचे आदरणीय प्राचार्य
डॉ. एस. डी. निबांळकर यांनी कृषि महाविद्यालयाच्या १३ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या