सातारा,दि.28: इमारत मागास प्रवर्गामधील पात्र व्यक्तींसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना, बीजभांडवल योजना, वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. याचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक डी.ए. काकडे यांनी केले आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा पूर्णपणे ऑनलाईन असून अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org या पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी. विंग दुसरा मजला बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाण पुलाजवळ, सातारा येथे व कार्यालयाच्या 02162-295184 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.