उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत माहे ऑगस्टमध्ये तालुक्यांच्या ठिकाणी दौरा

 

                सातारा दि . 27 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा मार्फत खाजगी नवीन वाहन नोंदणी व तत्सम कामकाज तसेच पक्की अनुज्ञप्ती व तत्सम कामकाज करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक यांचा सातारा जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी माहे ऑगस्ट 2022 मध्ये खाली नमुद केलेल्या दिनांकास दौरा आयोजित केला आहे.

                फलटण दि. 4,11,18 व 25 ऑगस्ट 2022. वाई 3 व 17 ऑगस्ट, वडूज 5 व 19 ऑगस्ट, दहिवडी 12 व 26 ऑगस्ट, खंडाळा 10 व 24 ऑगस्ट,  लोणंद 29  ऑगस्ट व कोरेगाव  8 ऑगस्ट 2022 रोजी.

                तसेच कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी, सातारा यांच्या आदेशान्वये वरील दौऱ्याच्या कामकाजामध्ये बदल करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी कळविले आहे.

 

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!