चौकट १) एमआयडीसी वाचवा या मथळ्याखाली
पहिली बातमी ८ जुलै रोजी दैनिक प्रभात मध्ये आम्ही प्रसिद्ध करंताच आमदार गोरे समर्थक असलेल्याच्या नाकाला जोरदार मिरची झोबली होती त्यावेळी सोसलमिडीयावर वेग वेगळी कमेट करणारे आत्ता एमआयडीसी कोरेगांवला जात आहे त्यावर त्यांच्या नेत्याला हा सोसलमिडीयाखोर का विचारत नाही आत्ता त्याची दातखिळी बसली का
२) माणसह म्हसवड मधून शेकडो बेरोजगार तरुणांचे काॅरोडोर एमआयडीसी म्हसवड मध्येच रहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल केले
३) म्हसवड मधील एमआयडीसी बचावासाठी समिती स्थापन केली या समितीने कागदी घोडे नाचवले तर दुसरीकडे आमदार समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन एमआयडीसी बचाव समितीवर आरोप करत एमआयडीसीच्या बाबतीत राजकारणाचा आखड्डा बनवून आरोप प्रत्यारोपणाचे कलगीतुर्याच्या
फैरी झाडल्या मात्र एका हि माणच्या लालाने रस्त्यावर उतरून एमआयडीसी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरुण, किंवा तहसीलदार,जिल्हाधिकारी यांचे कार्यालया समोर आंदोलन केले नाही आज पर्यंतचा इतिहास आहे उरमोडी, जिहे-कठापूर, धोम बलकवडी व टेंभु पाण्यासाठी राजकारण केले, उरमोडी शिक्के उठवण्यासाठी राजकारण केले, मात्र एमआयडीसी वाचवण्यासाठी कोणी हि घरा बाहेर पडले नाही याची खंत आहे
४) काॅरीडोर एमआयडीसी म्हसवड येथेच व्हावी यासाठी माण मधील सर्व पत्रकार बांधवांनी म्हसवड येथील एमआयडीसी जागेच्या ठिकाणी पत्रकारांनी घोषणाबाजी करत एमआयडीसी हटवण्याच्या निर्णयाचा निषेध केला
उद्या मंत्रालयात म्हसवडच्या एमआयडीसीचा कौल कोणाकडे म्हसवड कि कोरेगांव, कोरेगांव माणच्या आमदारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न कि दिलजमाई
एल के सरतापे/म्हसवड :
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुष्काळी भागात वेगळा काही तरी प्रकल्प उभा होत आसल्याने माणवाशीयांना पहिल्यांदाच आशेचा किरण
एमआयडीसीच्या माध्यमातून दिसु लागला होता माण, खटाव सह आटपाडी, सांगोला, माळशिरस, पंढरपूर दुष्काळी भागातील लाखो तरुण काम धंद्यासाठी मुंबई पुणे वसई, सुरत, बेंगलोर येथे जातात त्यांना या ठिकाणी काम उपलब्ध होऊन दुष्काळी परिसराचे नंदनवन होऊन कायम दुष्काळात पिच असलेल्या लोकांना दिलासा या औरंगाबाद बेंगलोरच्या धरतीवर माण तालुक्यात म्हसवड हद्दीवर आठशे एकरावर होणारी कॅरिडोर एमआयडीसीने आशा पल्लवित झाल्या होत्या याच्या जमिनी अॅकवायर होऊन केंद्राकडुन नोटिफिकेशन्स होऊन निधीची तरतूद करण्यात आली असताना नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारला चुकीची माहिती देवून बागायत, कारखानदारी असलेल्या ठिकाणी हि एमआयडीसी नेहण्याचा डाव आखला जात आहे यावर आज मंगळवारी होणारी बैठक उद्यावर म्हणजे बुधवारी गेल्याने बुधवारच्या आमदारांच्या होणार्या बैठकीत एमआयडीसीचा दुष्काळी भागातील तरुण रोजगारा पासुन वंचित राहणार की बागायतदार, कारखानदारीकडेच एमआयडीसी जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
एमआयडीसी स्थलांतरित होण्याचे वावटळ उठल्याने दुष्काळी जनतेच्या डोळ्यासमोर सध्या अंधार पसरला आहे.या प्रस्तावित एमआयडीसीसाठी लागणारी आठशे एकर जमीन म्हसवड, धुळे, मासाळवाडी व ढोकमोड परिसरात उपलब्ध आहे सपाट कोठेही डोंगर झाडी नसलेली सपाट जमीन याचा सर्वै हि मुंबई दिल्ली कोल्हापूर येथील अधिकारी यांनी करुन या एमआयडीसी वर शिक्कामोर्तब केला होता अनेक परराज्यातील परदेशी कंपन्या आपले व्यावसाय येथे आणण्यासाठी तयार होते त्यामुळे या एमआयडीसीचे नोटिफिकेशन्स होऊन निधीची तरतूद करण्यात आली होती यामुळे म्हसवड परिसरातील सात तालुक्याती बेरोजगार तरुणांना स्थानिक पातळीवर
रोजगार व नोकरीची संधी मिळणार आहे. प्रस्तावित एमआयडीसीलगतच सातारा म्हसवड-लातूर व सातारा-
म्हसवड-सोलापूर असे सुसज्ज रस्ते उपलब्ध आहेत. पुणे-बंगळूर हा नवीन मंजूर केंद्रीय महामार्ग एमआयडीसीपासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. सोलापूर-पुणे व नगर हा केंद्रीय महामार्गही २५ किलोमीटर अंतरावर आहे.फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गातील प्रस्तावित मंजूर रेल्वेस्टेशनलगतच्या
माळशिरस तालुक्यातील जळुबाई घाटाखाली एमआयडीसीपासून सहा किलोमीटर अंतरावर होणार आहे.
लोहमार्गासाठी यापूर्वीच भूसंपादन झाले आहे. तालुक्यात उरमोडीचे पाणी आले आहे. प्रस्तावित मंजूर जिहे-कठापूर
प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचेही पाणी उपलब्ध होणार आहे.माळशिरस तालुक्यात नीरा उजवा
कालवा एमआयडीसीपासून १३ आहे. किलोमीटरवर माळशिरस तालुक्यात आहे. मुबलक कमी किमतीत जमीन,
रस्ते, वीज, पाणी या एमआयडीसीसाठी गरजेच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.त्याच प्रमाणे विजेची गरज स्थानिक
पातळीवर भागू शकते. माण तालुक्यातच म्हसवडलगत म्हसवड पळसावडे, शिरताव याठिकाणी तीन मोठे सोलर वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित असून, माण तालुक्यातील
डोंगर माथ्यावर वीजनिर्मितीच्या पवन चक्क्या कुकुडवाड, आगासवाडी,विरळी, चिल्लारवाडी, पुकळेवाडी,कुळकजाई, खोकडे, बोथे, वारुगड, श्रीपालवण या गावात कार्यान्वित
असल्यामुळे वीज निर्मिती दररोज होत असल्याने वीज टंचाईची समस्या येणार नाही. त्यामुळे एमआयडीसीला
लागणारा वीज पुरवठा या भागातच निर्माण झालेल्या अपारंपरिक ऊर्जा निर्मितीतूनच उपलब्ध होणार आहे. येथे
निर्माण होणारी वीज येथेच वापरता येणार आहे
सातारा,सांगली, सोलापूर या दुष्काळी तालुक्यांतील बेरोजगारांना रोजगारासह उद्योग उभारण्याची संधी या एमआयडीसीने होणार असल्याने गेल्या महिन्यात राज्य
सरकारने मंजूर केलेली एमआयडीसी सातारा-कोरेगाव येथे स्थलांतरित करूनये यासाठी समिती तयार केली या समितीच्या माध्यमातून जागृता करुन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना माणच्या व्यथा सांगीतल्या गेल्या तरी हि त्यांच्यावर नक्की दबाव कोण आणीत आहे कोरेगांव येथे एमआयडीसी नेहण्यामागचा खरा सुत्रधार कोण यापुर्वी माणच्या हक्काचे दोन वेळा पाणी विकुण मोठे झालेले माण मधील राजकारणी आत्ता एमआयडीसी तर विकण्याचा घाट घालत नाहीत ना अशी हि चर्चा सध्या जोरदार सुरू आहे