गोखळी (प्रतिनिधी) :
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, फलटण च्या प्राचार्या सौ.ज्योती दत्तात्रय मेटे (५६)यांचे प्रदिर्घ आजाराने शनिवार दि.२३जुलै पहाटे पाच वाजता निधन झाले. शांत, संयमी , अत्यंत हुशार, प्रामाणिक व तत्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व. सेट परीक्षा राज्यात प्रथम, जिल्हा प्रशिक्षण संस्था मध्ये निवड निवडीपूर्वी जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी संचलित फलटण बी. एड .कॉलेजमध्ये 1991 ते 1995 पर्यंत प्राध्यापक म्हणून काम. खुंटे माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक दत्तात्रय मेटे यांच्या पत्नी होत. त्यांचे पश्चात त्यांचे पती , दोन अविवाहित मुले आहेत. त्यांच्यावर त्यांच्या मुळ गावी भिमानगर (उजनी धरण)ता.माढा जि.सोलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.