दुधेबावी ( गोखळी):
जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी संचलित दुधेश्वर माध्यमिक विद्यालय दुधेबावी ता.फलटण या विद्यालयांमध्ये विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकल वाटप, गणवेश ,शालेय साहित्य जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री चिमणराव कदम ( भैय्यासाहेब) यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पेट्रोल पंपाचे मालक प्रशांत दळवी साहेब, दुधेबावी विकास सोसायटीचे माजी चेअरमन त्रिंबक सोनवलक, ग्रामपंचायत सदस्या सौ सुनिता सोनवलकर पत्रकार सुभाष सोनवलकर ,साहेबराव सोनवलकर भाऊसो सोनवलकर ,किरण सोनवलकर, माजी सरपंच त्र्यंबक सोनवलकर. ,शेखर नाळे, मधुकर सोनवलकर, दादा नाळे सर,किरण चांगण, आडके सर सुरेश सोनवलकर, सचिन सोनवलकर संजय सोनवलकर किसन वावरे व पालक, दुधेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सपकाळ सर, पवार सर, सोनलकर सर,शिंदे मॅडम ,बेंद्रे मॅडम उपस्थित होते त्याचबरोबर विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे मॅडम यांनी केले मान्यवरांचे आभार रविंद्र पवार सर यांनी मानले.