फलटण दि. 22 :
मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी मधील कला , वाणिज्य व विज्ञान शाखेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दि. 29 जुलै व शनिवार दि. 30 जुलै या दोन दिवशी आंतरकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य मा. प्रा. एस. आर. वेदपाठक यांनी दिली.
यावेळी बोलताना उपप्राचार्य वेदपाठक यांनी सांगितले की संस्थेचे सचिव मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एच.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या खेळातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांच्यात स्पर्धेचे पोषक वातावरण तयार होण्यासाठी पावसाळी आंतर कुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 29 व 30 जुलै रोजी मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उदघाटन शुक्रवार दि. 29 जुलै रोजी सकाळी 8.30 वा. मा. श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, सदस्य गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, व महाविद्यालय विकास समिती यांच्या शुभहस्ते होणार आहे .
या स्पर्धेमध्ये खो-खो (मुले, मुली), हाप पिच क्रिकेट,ॲथलेटिक्स (100 मीटर व 400 मीटर धावणे) , 100×4 रिले धावणे, गोळाफेक इत्यादी सांघिक व वैयक्तिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे . सांघिक व वैयक्तिक खेळातील विजेते व उपविजेते खेळाडूंना प्रमाणपत्र व मेडल दिले जाणार आहे .
सदरच्या पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेबद्दल विद्यार्थ्यांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी जिमखाना विभाग व खेळ समन्वयक शिक्षक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपप्राचार्य एस. आर. वेदपाठक यांनी केले आहे.