उच्च माध्यमिक व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा केंद्रावर कलम 144 लागू

 

 
            सातारा दि. 19 :  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पडावी तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये  म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी, सुनिल थोरवे,यांनी  क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 गधील तरतुदी नुसार   प्राप्त असलेल्या अधिकारान्वये सातारा जिल्ह्यातील 9 परीक्षा केंद्रावार होणा-या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एस.एस.सी.) परीक्षेसाठी दिनांक 27 जुलै 2022 चे 00-00 वाजलेपासून ते 12 ऑगस्ट 2022 चे 24 00 वाजेपर्यंत या कालावधीत तसेच सातारा जिल्हयातील 6 केंद्रावर व 7 परिरक्षक केंद्रावर होणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एच.एस.सी.) परीक्षेसाठी दिनांक 21 जुलै 2022 चे 00.00 वाजलेपासून ते 12 ऑगस्ट 2022 चे 24-00 वाजेपर्यंत या कालावधीत परीक्षा केंद्र व उपकेंद्राचे परिसरात व त्या भोवतालचे 100 मिटर परिसरात परिक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी – कर्मचारी, सुरक्षा अधिकारी – कर्मचारी यांना वगळून इतर व्यक्तींना प्रवेश करणेसाठी तसेच परीक्षेचे कालवधीत परीक्षा केंद्राच्या परिसरापासून 100 मीटर पर्यंतची एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशिन, चालू ठेवण्यास याद्वारे मनाई-प्रतिबंध केले आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!