बारामती :
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रुई गावठाण व रुई हद्दतील विद्या प्रतिष्ठान शेजारील भागात बारामती नगर परिषद आणि सोशल लॅब यांच्या वतीने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलं होते
या प्रसंगी नगरपरिषद च्या माजी नगरसेविका सुरेखा चौधर, दत्तू चौधर,पांडुरंग चौधर गुलाब चौधर,सुरज चौधर नवनाथ चौधर प्रा अजिनाथ चौधर शुभम कांबळे,राहुल शिंदे,बापू कदम आशा केकाण,लताबाई चौधर संगीता चौधर, लीना आदमीले, राजेंद्र साळुंके, हनुमंत चौधर, सत्यवान चौधर व नगरपरिषद चे आरोग्य अधिकारी राजेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्तित होते
स्वछता व पर्यावरण वर रुई परिसरात गेल्या पाच वर्षात मोठे कार्य झाले असून स्वछता विषयी जनजागृती नागरिकांमधून वाढली आहे तर वृक्षारोपण च्या माध्यमातून कार्य केल्याने हरित रुई व स्वच्छ रुई चे चित्र पाहवयास मिळत असल्याचे समाधान असल्याचे सुरेखा चौधर यांनी सांगितले या वेळी पांडुरंग चौधर यांनी आभार मानले
——————————————