बारामती :
मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कूल च्या वतीने तालुकास्तरीय चित्रकला व रंगभरण तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.त्याचा शुभारंभ आज संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष श्री.किरण तावरे यांच्या हस्ते झाला.यावेळी कार्यक्रमाला सदाशिव सोरटे,बबन गावडे सर , योगेश तावरे ,राहुल चांदगुडे, संस्थेचे अध्यक्ष श्री.संग्रामसिंह मोकाशी,सचिव सौ.संगीता मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गायन केले.श्री.किरण तावरे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोकाशी यांनी केले.स्पर्धेचे पहिले वर्ष असून विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे.असाच सहभाग वक्तुर्त्व स्पर्धेला मिळेल अशी भावना व्यक्त केली.आभार प्राचार्य वनवे सर यांनी केले मनोगत गोफणे सर यांनी केले.व कार्यक्रम संपन्न झाला.