प्राध्यापक नितीन महादेव नाळे यांचा श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने जाहीर सत्कार संपन्न

 

फलटण दि 16 :

 श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे संस्थापक कैलासवासी सन्माननीय आदरणीय नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी बेडके साहेब यांचं 27 वे पुण्यस्मरण दिन श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सध्या आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या चिकित्सा विभागाच्या राष्ट्रीय सदस्य पदी नेमणूक झालेले श्रीमान डॉ.सूर्यकिरण परशुराम वाघ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्रीमान श्री सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी बेडके साहेब मानस सचिव श्रीमान श्री डॉक्टर सचिन भैय्या सुभाषराव सूर्यवंशी बेडके साहेब संस्थेचे उपाध्यक्ष श्रीमान श्री चंद्रकांत पवार साहेब श्रीमान श्री मोदी साहेब नियमक मंडळाचे सदस्य* *श्रीमान श्री महेंद्र भैय्या सुभाषराव सूर्यवंशी बेडके साहेब व सर्व शाखांचे प्राचार्य सेवानिवृत्त प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक गण शिक्षकेतर कर्मचारी आणि हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक शिक्षिका वृंद तसेच याच्याशी आणि एसएससी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले सर्व गुणवंत विद्यार्थी खेळामध्ये प्राविण्य मिळालेले जिल्हा राज्य राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक यादव सर यांनी केले सुरुवातीला संस्थेने . अभिनंदनचा ठराव केलेल्या तीन मान्यवरांचा संस्थेच्या वतीने जाहीर सन्मान सत्कार करण्यात आला यामध्ये प्रथमतः संस्थेच्या वतीने सन्मानपत्र शाल श्रीफळ कंदीपेढे बुके व श्रीरामाची प्रतिमा देऊनराष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे सदस्य श्रीमान श्री डॉक्टर सूर्यकिरण परशुराम वाघ सर यांचा जाहीर सत्कार संस्थेचे मानस सचिव डॉक्टर सचिन भैय्या सुभाषराव बेडके साहेब व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाला
तदनंतर कैलासवासी नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य राऊत सर यांची राज्यपाल कार्यकारणी नियुक्त महिला व बालकल्याण समिती यांचे मार्फत सातारा जिल्ह्याच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही जाहीर सत्कार संस्थेचे मानस सचिव डॉक्टर श्री सचिन भैय्या सुभाषराव सूर्यवंशी बेडके साहेब व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाला सत्कारामध्ये मानाची शाल श्रीफळ कंदी पेढे बुके व श्रीरामाची प्रतिमा देऊन करण्यात आला
   तदनंतर श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक श्री नितीन महादेव नाळे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमान श्री सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी बेडके साहेब मानस सचिव श्रीमान श्री डॉक्टर सचिन भैय्या सुभाषराव सूर्यवंशी बेडके साहेब आयुष मंत्रालय भारत सरकारचे राष्ट्रीय चिकित्सा विभागाचे सदस्य डॉक्टर सूर्यकिरण परशुराम वाघ साहेब संस्थेचे उपाध्यक्ष श्रीमान श्री चंद्रकांत पवार साहेब संस्थेचे नियमक मंडळाचे सदस्य महेंद्र भैय्या सुभाषराव सूर्यवंशी बेडके साहेब तसेच संस्थेचे वरिष्ठ नियमक मंडळाचे सदस्य व उपाध्यक्ष श्रीमान श्री मोदी साहेब व संस्थेचे सर्व प्राचार्य मुख्याध्यापक आजी-माजी प्राचार्य सेवानिवृत्त कर्मचारी व हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन भैय्या यांनीसंस्थेच्या एकूण . कामकाजाविषयी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती विषयी व संस्थेचे माजी विद्यार्थी व कार्यरत असणारे प्राध्यापक शिक्षक यांच्या कामकाजाविषयी प्रोत्साहनात्मक व अभिमानास्पद कामगिरी सुरू आहे याबद्दल सत्कारमूर्तींचे भरभरून कौतुक केलं व पुढील काळातही कामगिरीमध्ये असंच सातत्य ठेवा संस्था आपल्या पाठीशी भक्कमपणे आहे असा भरभरून शुभाशीर्वादही दिला संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्रीमान श्री सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी बेडके साहेब यांनीही नानांनी संस्था स्थापन करत असताना स्वतःच्या संसारातील वेळप्रसंगी असणार सर्व पैसे सोने नाणे दागिने याचा वापर करून सुरुवातीला आठवीचा वर्ग सुरू केला व कर्मचाऱ्यांना पाणी पिण्यासाठी स्वतःच्या घरातीलच एक हंडा व पिंप आणून या ठिकाणी मांडला अशी आठवण अगदी काकांनी भावना दिवस होऊन मांडली व नानांबरोबर त्यांचे असणारे शिलेदार          जानोजीराव भोईटे जयंतराव वानपट तरडगाव चे अडसूळ साहेब दिबा नाळे झिरपे वकील धुमाळ डॉक्टर असे कितीतरी साथीदारांच्या अथक प्रयत्नामुळेच याशिवाय पवार साहेब मेटकरी साहेब असे नानांचे जिवलग मित्रांच्या सहकार्यामुळेच ही संस्था उभी राहिल्याचे त्यांनी सांगितले व समाजातील गोरगरिबांच्या मुलाच्या शिक्षणाची गंगा ही आता सांभाळा मुलं हळूहळू कमी होऊ पाहत आहेत सर्व शिक्षकांनी त्याकडे लक्ष द्या असा वडीलधारी सल्लाही दिला व अत्यंत भावपूर्ण असा क्षण आदरणीय काकांनी आठवण आरोपी सांगितला व खऱ्या अर्थाने कैलासवासी नानांचा 27 वा स्मृतिदिन अत्यंत भावपूर्ण संदेश प्रधान प्रेरणादायी असा संपन्न झाला
        ..दुसऱ्या सत्रामध्ये जे जे संस्थेचे कर्मचारी उदाहरणार्थ प्राचार्य मुख्याध्यापक उपशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत यांचाही मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला त्यानंतर एचा एस सी व एसएससी परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या* विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला त्यानंतर यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सस्ते मॅडम यांनी नानांच्या शिक्षणासाठी कार्यावर आधारित अप्रतिम कविता सादर केली व त्यानंतर यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री सचिन राऊत सर यांनी आभार प्रदर्शन केलं
         अशाप्रकारे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आदरणीय सन्माननीय कैलासवासी नामदेवराव सूर्यवंशी बेडके उर्फ नाना यांचा 27 वा स्मृतिदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि नानांनी त्याकाळी संस्था स्थापन करत असताना घेतलेल्या कष्टाची त्यांनी गाळलेल्या घामाची कर्मवीर भाऊराव पाटलांनी दिलेल्या साथीची आणि कार्यकर्तृत्वाने मोठं होता येतं हाच संदेश घेऊन अत्यंत सुंदर असा कार्यक्रम प्रेरणादायी असा कार्यक्रम संपन्न झाला 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!