वाठार निंबाळकर दि .७ :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार निंबाळकर येथे वृक्षदिंडी ,वृक्षारोपण व बक्षीस वितरण समारंभ संपन्न.
कृषी महाविद्यालय फलटण व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार निंबाळकर ,वाठार हायस्कूल वाठार यांचे संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व पर्यावरणावर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
यावेळी वृक्षारोपण व बक्षीस वितरण समारंभ वाठार निंबाळकरचे माजी सरपंच आदरणीय श्री. अशोकराव निंबाळकर, सौ. शोभाताई निंबाळकर मॅडम, वाठार निंबाळकर गावच्या उपसरपंच सौ. अनिता प्रकाश तरटे मॅडम तसेच पोलीस पाटील श्री. दत्तात्रय ढोक ,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री.विजयसिंह नाईक निंबाळकर . व्हा. चेअरमन संजय शिंदे तसेच उद्योजक फरांदे ,कृषी अधिकारी कांबळे साहेब. वाठार हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. मुळीक मॅडम , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. कृष्णात कुंभार सर यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी स्पर्धांचे बक्षीस बक्षीस वितरण करण्यात आले. वृक्षारोपणाचे महत्व व पर्यावरणाचे संरक्षण याविषयी कुंभार सर यांनी मार्गदर्शन केले .तसेच यावेळी प्राचार्य धायगुडे सर ,धालपे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले . या वेळी सुतार मॅडम , भोसले सर आवारे सर, कचरे सर माने मॅडम,निकाळजे सर,सस्ते सर,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने बक्षिसे व खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व आभार कृषी महाविद्यालय फलटणच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.