महाराष्ट्र कृषी दिनी शेरेचीवाडी येथे वृक्षदिंडी, वृक्षारोपण, बक्षीस वितरण समारंभ संपन्न

फलटण ,दि 09:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरेचीवाडी येथे वृक्षदिंडी, वृक्षारोपण, विविध स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी कृषी महाविद्यालय फलटण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरेचीवाडी व गावातील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण, विविध स्पर्धा व बक्षीस वितरण  विविध कार्यक्रम जि. परिषद प्राथमिक शाळा, शेरेचीवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. 

तसेंच गावातील मारुती मंदिरामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मेळावा आयोजित करण्यात आला.यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी-कृषिसहाय्यक राजदीप जगताप,मंडळ कृषी अधिकारी सतिष निंबाळकर, कृषी पर्यवेक्षक रवींद्र बेलदार  अधिकारी उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या अंती कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद नलवडे (सरपंच मौजे शेरेचीवाडी) यांनी सर्वांचे आभार मानले.
आयोजित समिती कृषिदूत :- यश शिंदे , शुभम मेमाणे, धनेश धायगुडे ,पार्थ खलाटे ,श्रेयश खलाटे,गणेश खळदकर ,यश कापडी. आदि उपस्थित होते
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!