वाठार निंबाळकर दि. 25 :
आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर आयोजित, आई सन्मान पुरस्कार 2022 या पुरस्काराचे वितरण रविवारदि.26 जुन रोजी दुपारी 2.00 वा. स्वप्नशीला मंगल कार्यालय वाठार निंबाळकर या ठिकाणी होणार असून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते व फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.दिपकराव चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर सभापती पंचायत समिती फलटण यांच्या प्रमुख उपस्थितीत व सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ताबापू अनपट तसेच भावनाताई सोनवलकर व सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व फलटण तालुक्यातील शिक्षक संघटनेच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंताना हा पुरस्कार दरवर्षी आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर यांच्यावतीने दिला जातो. अशी माहिती आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकरचे अध्यक्ष श्री.गणेश तांबे यांनी दिली आहे.