बारामती :
बारामती तालुक्यातील ज्ञानसागर इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागतिक योग दिनामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन अतिशय उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना योगासनाचे बकासन, मयुरासन, शिर्षासन, धनुरासन असे वेगवेगळे प्रकार प्रत्येक्षात करून दाखवण्यात आले व ही
योगासने केल्याने होणारे फायदे म्हणजे फक्त शरीरच तंदुरुस्त राहत नाही, तर त्यामुळे मनःशांती, तजेलदार त्वचा मिळते. तसेच वजनातही घट होते. योगासने करण्याला वयाची कोणतीही मर्यादा नसते. फक्त तुमच्या शरीरयष्टीनुसार व तुम्हाला असलेल्या व्याधींनुसार योगासने निवडावीत असे आवाहन योगा शिक्षिका स्मिता कदम व रुपाली देवकर यांनी विद्यार्थ्यांनी दिली.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर आटोळे सर, दिपक सांगळे, रेश्मा गावडे,मानसिंग आटोळे, पल्लवी सांगळे, दिपक बिबे, सीईओु संपत जायपात्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, निलिमा देवकाते, स्वप्नाली दिवेकर, राधा नाळे व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.