परिक्षेला बसले १५१तर पास झाले १४७ , यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन
म्हसवड प्रतिनिधी :
मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने एस एस सी बोर्डने नुकताच निकाल जाहीर केला.या परीक्षेमध्ये मध्ये सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेज म्हसवड विद्यालयाचा निकाल ९७.२७ % लागला असून सिध्दनाथ हायस्कूलने यशाची परंपरा कायम राखली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १०वीच्या परिक्षे मध्ये उज्वल यशाची परंपरा सिध्दनाथ हायस्कूलने कायम ठेवली आसुन पहिले तिन क्रमांक या प्रमाणे
प्रथम क्रमांक कु श्रद्धा महादेव चोपडे ९५.२०%
द्वितीय क्रमांक कु वैष्णवी चंद्रकांत निकम ९४.२०% तुतीय क्रमांक कु.ढाले श्रावणी अनिल ८८.८०%
चतुर्थ क्रमांक मुजावर मुस्कान समीर ८८.६०%
पाचवा क्रमांक कु.भाग्यश्री संदेश भिवरे ८८.२०%
प्रशालेत एकुण परिक्षेला बसले १५१ विद्यार्थी, पास झाले १४७ तर नापास झाले अवघे चार विद्यार्थी प्रशालेचा एकुण निकाल ९७.२७ % लागला
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विधानपरिषदेचे सभापती व अध्यक्ष फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण मा ना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर, मा रतनलाल दोशी सदस्य, सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेज स्कुल कमिटीचे चेअरमन श्री हेमंत रानडे, व्हा. चेअरमन श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, मा नितीन दोशी, श्रीमंत शिवराज राजेमाने, विपूल दोशी, संभाजी माने , प्रशासन अधिकारी मा अरविंद निकम, अधिक्षक मा श्रीकांत फडतरे प्राचार्य प्रविण दासरे , उपमुख्याध्यापिका रुक्साना मोकाशी, पर्यवेक्षीका लता शिंदे , दिलीप माने , वळवी, अजित काटकर उत्तम पोळ, वनिता गिते, सौ जगताप, शारदा सुर्यवंशी, वाय ए माने , सुजाता मोहिते, सौ शिंदे , महादेव नलवडे ,विजय नांगरे आदींनी यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले