बारामती :
जिद्द चिकाटी च्या जोरावर नौकरी सोडून स्वतःचा उद्योग उभारून ग्राहकास उत्तम सेवा देत असताना अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे व्ही आर बॉयलर प्रा. ली. कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले
बारामती एमआयडीसी मधील (गुरुवार 16 जून )
व्ही आर बॉयलर अँड सोलुशन प्रा.ली. कंपनीचा उदघाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते.या प्रसंगी मा.उपनगराध्यक्ष बाळासो जाधव,बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष प्रमोद काकडे, उपाध्यक्ष पंढरीनाथ कांबळे,बारामती मॅनुफॅक्चरिंग चे अध्यक्ष धनंजय जामदार,पंचयात समिती चे माजी गटनेते दीपक मलगुंडे,मराठा सिक्युरिटी चे संचालक प्रवीण जगताप व आदी मान्यवर उपस्तित होते.
बॉयलर रीपेरींग आणि पाईप फाब्रिकॅशेन चे काम बॉयलर साठी लागणारी चिमणी बनविणे तसेच पेंटिंग करून देणे,बॉयलर ऑपरेशन आणि वार्षिक मेंटेनन्स त्यासाठी लागणारे सर्व मटेरियल पुरवठा
बॉयलर साठी लागणारे सर्व आय बी आर वॉल आणि माउंटिंग फिटिंग
बॉयलर आणि स्टीम पाईपिंग साठी लागणारे इन्सुलेशन चे मटेरियल जसे की एलआरबी हॉट इन्सुलेशन आणि अल्युमिनियम कॅलॅडींग व त्या कामाकरीता लागणारे कुशल कामगार वर्ग, बॉयलर फर्णेस रीफॅक्टरी साठी लागणाऱ्या फायर ब्रिक आणि रिफॅक्टरी सिमेंट व त्या कामाकरीता लागणारे कुशल कामगार वर्ग, नवीन प्लांट कंपनी उभारणीसाठी लागणाऱ्या मशीनरी बसिवणे त्या साठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या पाईप लाईन तैयार करणे शेड उभारून देणे तसेच सर्व प्रकारच्या मशीनरी इरेक्शन कमिस्निंग करून प्लांट चालू करून देणे अशा प्रकारे सर्व काम व्ही आर बॉयलर च्या माध्यमातून केली जात असल्याचे संचालक राजाराम सातपुते यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले
उपसितांचे स्वागत गौरव सातपुते सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले