प्रतिक आढाव याच्या सत्कार प्रसंगी इतर मान्यवर
गोखळी( प्रतिनिधी):
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गुणवरे गावचे सुपुत्र प्रतिक आढाव यांची नुकतीच नायब तहसिलदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल गोखळी येथे जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गोखळी गावचे माजी.सरपंच नंदकुमार मामा गावडे, माजी.उपसरपंच डॉ.अमित गावडे, कोरेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व गोखळी गावचे आदरार्थी संजयकुमार बाचल साहेब, सेवानिवृत्त देशसेवक मेजर अशोक जगताप, शिवसेना विभाग प्रमुख अजितदादा धुमाळ, लहूजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष आकाश बागाव, भाजपा कार्यकर्ते वस्ताद प्रदीप आटोळे, शरयू अॅग्रोचे डीस्लरी व्यवस्थापक दादासो जगताप, सामाजिक कार्यकर्ते राहुल गावडे, सुनिल धुमाळ, स्वप्निल पवार, ज्ञानेश्वर तिवाटने, तुषार गेजगे, पवन जगताप, शहारूक शेख, संदीप हरिहर इत्यादी. तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत हे पारंपारिक वाद्य वाजवून तसेच फटाक्यांच्या आतेशबाजीने करण्यात आले तसेच प्रथमत: थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सत्कारमूर्ती आयु.प्रतिक आढाव साहेब यांचा नागरी सत्कार करण्यात आला.त्यानंतर शेखर लोंढे, डॉ.गणेश गावडे, संजयकुमार बाचल इत्यादींनी मनोगत व्यक्त केली त्यानंतर सत्कारमूर्ती यांचे तरुणांना मार्गदर्शनपर व मी कसा घडलो याबाबत जिवनपट त्यांनी व्यक्त केला तसेच शेवटी मेजर अशोक जगताप यांनी अभार मानले व चहा,नाष्टा अल्पोपहारा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली..!