बारामती :
मंगळवार दि. 14 जून रोजी वटपौर्णिमा निमीत्त प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडी येथे वडाच्या रोपट्याचे वृक्षारोपण करण्यात आले
राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या उपाध्यक्ष पदी रोहिणी आटोळे-खरसे यांच्या संकल्पनेतून 10 वडाच्या रोपट्याचे वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी डॉ दड्स, डॉ देवकाते, डॉ सावरकर, आशा तब्बू, आशा अश्विनी, परिचारिका ननवरे, देवकाते, कानाडे, भिसे आदी उपस्तित होते
विविध कारणांनी वडाच्या झाड तोडले जाते पर्यायाने पर्यावरण चा ऱ्हास होत असताना वडा मुळे सावली मिळते, भूगर्भात पाण्याची पातळी वाढते व अध्यात्मिक व धार्मिक दृष्ट्या वडाचे झाड महत्पूर्ण असल्याने व वटपौर्णिमा निमीत्त महिलांना पूजन करण्यासाठी वडाचे झाड उपलब्ध होणे साठी वृक्षारोपण केल्याचे रोहिणी आटोळे-खरसे यांनी सांगितले
स्वागत सौ मालती नेवसे तर आभार स्वाती जाधव यांनी मानले