राज्यामधे च काय तर देशामधे वृक्ष लागडीचा 'फलटण पॅटर्न ' करून दाखविणार : विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

फलटण येथे वृक्षारोपण कार्यक्रमात बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

फलटण :

फलटण येथे श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट , फलटण यांच्या वतीने इरिगेशन कॉलनी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी जागतिक पर्यावरण साठी येणेऱ्या काळामधे फलटण तालुक्यात पंधरा लाख वृक्षलागवडीचे उद्दीष्ट असून त्या प्रमाणे राज्यामधे च काय तर देशामधे वृक्ष लागडीचा ‘फलटण पॅटर्न ‘ करून दाखविणार असून भोंगे लावायचे की ठेवायचे त्यापेक्षा झाडे लावलेले परवडणार आहे जे काय वाढून ठेवला आहे त्यावर बोललं जात नाही. दहा झाडे लावली तरच तिकिट देणार , आज सर्व देशांपुढे जागतिक तापमान वाढीचे जे संकट ओढावले आहे , त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे . आपल्या इथे ते बोडके डोंगर आहेत तेथेसुद्धा आपल्याला वृक्षलागवड केली पाहिजे असे वन अधीकांऱ्यां च्या निदर्शनास आणून देत प्रत्येकाने किमान १४ झाडे लावली व ती जोपासली तरी पुष्कळ होईल तसेच झाडे लावून त्याचा समतोल टिकविणे गरजेचे असल्याचे विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट , फलटण यांच्या वतीने इरिगेशन कॉलनी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, महादेवराव माने संचालक श्रीराम सहकारी साखर कारखाना , डॉ. संजय राऊत, वृक्षमित्र डॉ. महेशराव बर्वे , युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर, प्रतापसिंह निंबाळकर , मुधोजी हायस्कूल चे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे , प्रा. सुधीर इंगळे व ईतर मान्यवर उपस्थित होते.

श्रीमंत रामराजे म्हणाले, तरुणांच्या पुढे कोव्हिडच संकट आहे तसच दुसरे एक भीषण संकट आहे ते म्हणजे जागतिक तापमान वाढ, तुम्हाला तिकीट पाहिजे असेल तर चौदा झाडे लावा अस बंधन घातल्याशिवाय वृक्ष लागवड होणार नाही, शौचालय असेल तर निवडणूक लढण्याचा कायदा आला. त्यानंतर , दोन अपत्य असतील तर निवडणूक लढविण्याचा कायदा आला आता झाडे लावली तर निवडणुका लढवण्याचा कायदा आला पाहिजे झाडे लावली , तर तिकिटे दिली पाहिजेत. तसेच शाळेमध्ये अँडमिशन घेताना सुधा झाडे लावण्याची सक्ती करून ती जोपासण्या ची हमी त्या पालकांकडून घेऊन मगच त्याला अॅडमिशन दिले गेले पाहिजे . आता तर भोंगे लावायचे की ठेवायचे यापेक्षा झाडे लावणे परवडणार असून राजकारण राजकारणाच्या पातळीवर ठेवून सर्वांनी वृक्षलागवडीच्या चळवळीकडे लक्ष देऊन पर्यावरणाचा समतोल राखावा लागणार आहे.

तरुण मुलं काय करणार आहेत आणि आणि त्यांना किती हौस आहे आणि ते किती ध्यास घेऊन काम करतील त्याच्यावर त्यांचं स्वतःचं भविष्य अवलंबून असणार आहे. शासनाने वनविभागाला वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिले असले , तरी हे उद्दिष्ट आपण सातारा जिल्ह्यात सर्वांनी एकत्र येऊन साध्य केले पाहिजे. फलटणमध्ये हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमच्या संस्था व इतरांना बरोबर घेऊन वृक्षारोपणाची वेगळी चळवळ उभी करून फलटण पॅटर्न उभारणार आहोत अशी घोषणा यावेळी श्रीमंत रामराजे यांनी यावेळी केली.


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!