शेरेचीवाडी (ढवळ )गावामध्ये शेतीशाळा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमासाठी मा मंडळ कृषी अधिकारी श्री सतीश निंबाळकर साहेब, कृषि महाविद्यालय फलटण च्या सहाय्यक प्राध्यापक डॉ प्राजक्ता खरात मॅडम, शेरेचीवाडी गावचे सरपंच श्री रवींद्र नलावडे, कृषी पर्यवेक्षक रविंद्र बेलदार, कृषी सहाय्यक श्री राजदीप जगताप, कृषि महाविद्यालय फलटण चे RAWE चे विद्यार्थी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कृषि महाविद्यालय फलटण च्या विद्यार्थ्यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तसेच लष्करी आळी बद्दल थोडक्यात माहिती सांगितली. त्यानंतर श्री राजदीप जगताप कृषी सहाय्यक ढवळ यांनी मका बियाणे वरती बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले व हुमणी किड नियंत्रण प्रकाश सापळे तसेच कृषक ॲप बद्दल माहिती सांगितली .
यावेळी डॉ. प्राजक्ता खरात मॅडम यांनी माती व पाणी परीक्षणाचे महत्व फायदे व माती नमुना कसा घ्यावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तदनंतर कृषी पर्यवेक्षक श्री रविंद्र बेलदार यांनी शेतकरी अपघात विमा तसेच सूक्ष्म सिंचन योजना व महाडीबीटी बद्दल माहिती सांगितली.
कृषि महाविद्यालय फलटण मधील RAWE विद्यार्थी शिंदे यश, मेमाणे शुभम, धायगुडे धनेश,खळदकर गणेश, कापडी यश,खलाटे पार्थ, खलाटे श्रेयश यांनी यावेळी विविध प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना करून दाखवली. शेवटी सरपंच श्री रवींद्र नलावडे यांनी आभार मानले.