बारामती :
बारामती एमआयडीसी येथील अस्मिता हिप्नॉथेरपी क्लिनिक च्या पुणे येथील शाखेस गुरुवार दि.26 मे रोजी राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांनी सदिच्छा भेट दिली व कार्याची माहिती जाणून घेतली यावेळी त्यांनी संमोहन उपचार , ह्यूमन राईट्स कौन्सिल व आयुष भारत संघटना व इतर विविध विषयांची माहिती डॉ.विजयकुमार काळे, रविकुमार काळे यांच्याकडून जाणून घेतली व डॉ. काळे यांच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी ह्यूमन राईट्स कौन्सिल व आयुष भारत संघटनेचे बारामती तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
———————————-