हॉटेल चा सुरक्षा रक्षक झाला एस आर पी एफ चा जवान

सूरज पाटील यांचा सत्कार करताना प्रवीण जगताप  व राजाराम सातपुते
बारामती  
जिद्द चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर यश हमखास मिळविता येते हे दाखवून दिले आहे हॉटेल सिटी इन चा सुरक्षा रक्षक सूरज  पाटील यांनी  त्याची राज्य राखीव पोलीस दलात जवान म्हणून  निवड झाली आहे. 
निवडी बदल त्याचा सत्कार मराठा इंटेलिजन्स सिकरुटी सर्व्हिसेस चे  शाखा व्यवस्थापक प्रवीण जगताप, हॉटेल चे व्यवस्थापक राजीव निमकर, मेजर किसान लोखंडे, फिल्ड ऑफिसर सोमनाथ पिसाळ, पर्यवेक्षक बापू खांडेकर, व्ही आर बॉयलऱ चे  संचालक राजाराम सातपुते आदी  नी केला. 
 मराठा सिक्युरिटी चा गार्ड म्हणून  सूरज  पाटील गेली आठ वर्षापासुन सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते मूळचे कौठाळी ता पंढरपूर जि. सोलापूर येथील असून नियमित ड्युटी  व नियमित पोलीस भरतीचा अभ्यास व सराव  हा  दिनक्रम  चालू होता.  घरची परिस्थिती खूप हलाखीची, वडील शेतमजूर ,आईचे ह्रदयाचे ऑपरेशन दरमहा पाच  हजार  रुपयांच्या गोळया औषधाचा खर्च,शिक्षणाचा खर्च  तो  काम करून भागवत  होता व  एवढे कष्ट करून  भरती झाला 
प्रामाणिक व होतकरू तरुणास  नोकरी देऊन यश  मिळवण्यास  सहकार्य केल्याचे  समाधान  वाटत  असल्याचे प्रवीण  जगताप  यांनी सांगितले  
स्पर्धा  परीक्षेची सुद्धा तयारी करीत असून लवकरच अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होईल असे सूरज पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!