मुधोजी महाविद्यालय, फलटणच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख आकर्षण ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी

फलटण दि. 28 :
फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय , फलटणचा सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील  वार्षिक  पारितोषिक  वितरण समारंभ    सोमवार दि. ३० मे २०२२  रोजी जिमखाना विभाग , मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे  होणार असल्याची माहिती  महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य  डाँ.पी.एच. कदम यांनी दिली आहे .

 सदरच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक  कुस्ती क्षेत्रातील  महाराष्ट्रातील अव्वल स्पर्धा  असणारी महाराष्ट्र केसरीचे  सन २०१४-२०१५ -२०१६  या वर्षातील विजेते ट्रिपल महाराष्ट्र केसरी,  सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे शहर, आणि  शिवछञपती पुरस्कार विजेते मा.पै.श्री.विजय चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष  महाराष्ट्र राज्य खो- खो  असोसिएशनचे  ,अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे , सेक्रेटरी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर  हे असणार  आहेत.
प्रमुख उपस्थितीमधे युवा नेते मा.श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर माजी सभापती , पंचायत  समिती , फलटण मा. श्री . बापूराव लोंखडे –  ,महाराष्ट्र केसरी , मा.श्री .गोरख  सरक , महाराष्ट्र केसरी  हे  मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

या मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयातील  शैक्षणिक  वर्ष  २०२१-२२  मधे  क्रीडा  विभाग व सांस्कृतिक  विभागातील   जिल्हा , राज्य , राष्ट्रीय , आंतर विभाग , शिवाजी विद्यापीठ,  कोल्हापूर , अखिल  भारतीय  आंतर विद्यापीठ  स्पर्धा  मधे विशेष प्राविण्य  प्राप्त  खेळाडू  –  कलाकार,    एन.सी.सी.- एन.एस.एस.  , व गुणवत्ताधारक विद्यार्थी यांना पारितोषिके देण्यात  येणार आहेत. 

यावेळी फलटण तालुक्यातील क्रीडा  क्षेत्रात   उल्लेखनीय कामगिरी करणारे  आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे .तरी खेळाडू , कलाकार , गुणवंत विद्यार्थी ,पालक यांनी  वार्षिक पारितोषिक  वितरण समारंभास उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डाँ.पी. एच .कदम  यांनी केले आहे .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!