फलटण दि. 17:
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण, साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण व जायंटस ग्रुप फलटण यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी व बुद्ध पौर्णिमा या निमित्ताने अभिवादन संयुक्त कार्यक्रमात नवचेतना कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य शांताराम आवटे होते यावेळी प्रमुख उपस्थिती साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशनचे अध्यक्ष व साहित्यिक ताराचंद्र आवळे, ला.मोहनराव नाईक निंबाळकर,शिरीष शहा यांची होती. नवचेतना कविसंमेलनात कवी राहुल निकम प्रा.अशोक माने,ज.तु. गारडे आकाश आढाव, अविनाश चव्हाण, प्रा. नितीन नाळे,गुडाराज नामदास,प्रतीक्षा कांबळे, ऐश्वर्या जगताप यांनी बहारदार कविता सादर केल्या. या कविसंमेलनाततून आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रेरणादायी, वास्तववादी, कर्मवीर भाऊराव पाटील व बुद्ध यांना अभिप्रेत असणारा समाज कसा असावा प्रेम,मोह,माया,समाजशिक्षण अशा आशयाच्या विविधांगी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली व उपस्थितांनी भरभरून दाद दिली. प्राचार्य शांताराम आवटे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील व बुद्ध यांचे चरित्रावर प्रकाशझोत टाकून आपण कसे जगावे यावर भाष्य केले. संयोजक ताराचंद्र आवळे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आभार कवी अविनाश चव्हाण यांनी मानले. यावेळी ला.प्रभाकर भोसले, नितीन बोडके,दत्तात्रय खरात, राजेश पाटोळे, सौ. सुरेखा आवळे व साहित्यप्रेमी रसिक उपस्थित होते.