सातारा, दि. 13: व्हॉलीबॉल खेळाच्या कौशल्य व गुणवंत खेळाडूंचा शोध घेणे व त्यांना मर्यादित कालावधीतच अत्युच्च प्रशिक्षण देण्यासाठी फक्त व्हॉलीबॉल खेळातील मुलींची निवड चाचणी गुरुवार दि. 18 मे 2022 रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी सातारा जिल्ह्यातील ज्या मुलींचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील असेल व ज्यांची उंची सरासरी 175 सें.मी. असेल, तसेच सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा, विभाग, राज्यस्तर स्पर्धेमध्ये सहभागी होऊन प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक संपादन केलेला असेल अशा व्हॉलीबॉल मुली खेळाडूंनी जास्तीत जास्त प्रमाणत निवड चाचणीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.