विद्या प्रतिष्टान महाविद्यालयाचा विद्यार्थी अमोल श्रीकृष्ण साळुंके याची दक्षिण कोरिया येथे पीएच. डी. साठी निवड

बारामती :
बारामती विद्या प्रतिष्टान कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी अमोल श्रीकृष्ण साळुंके याची दक्षिण कोरिया येथे पीएच.  डी.  साठी निवड झाली आहे.     
अमोल साळुंके याने बी. स्सी  रसायनशास्त्र  ही पदवी कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय  बारामती व  एम.एस्सी. नॅशनल  इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्रिची येथून संपादन केली. त्याची नुकतीच डोन्गगूक युनिव्हर्सिटी,सेऊल ,दक्षिण कोरिया येथे पीएच.  डी.  साठी निवड झाली आहे.
डॉ . रमेश देवकते यांचे दक्षिण कोरिया मधील सहकारी डॉ . अकबर इनामदार व  ह्यूनसिक  इम यांच्या मार्गदर्शनाखाली तो पीएच.  डी.चे  संशोधन पूर्ण करेल. 
मागील एक  वर्षापासून तो डॉ . रमेश देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात  संशोधन करीत होता.  
या महाविद्यालयातून पीएच.  डी. साठी दक्षिण कोरिया येथे जाणारा तो पहिलाच विद्यार्थी आहे. 
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात सध्या जैवतंत्रज्ञान, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या तीन विषयात विद्यार्थ्यांना पीएचडी करण्याची सोय आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. पी. व्ही. पाटील यांनी साळुंखे यांचे हार्दिक अभिनंदन केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!