प्रसिद्ध गझलगुरू ग्रामीण साहित्यिक प्रकशदादा बनसोडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त इंदापूर येथे भव्य काव्य संमेलन संपन्न झाले. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील कवी कवयित्री,गझलकारांना निमंत्रित केले होते .इंदापूर येथील हाॅटेल स्वामीराज महतीनगर इंदापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संमेलनाध्यक्ष पदी लोककवी डॉ.मदन देगावकर स्वागताध्याक्ष व अबोली प्रकाशन संस्थेचे प्रकाशक बापूसाहेब भोंग आणि प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार राजेंद्र भागवत, काव्यफुले मराठी साहित्य व कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलम शेख, न्यायिक लढा पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष कवी विकास राऊत, महाराष्ट्राच्या आधुनिक बहिणाबाई विमलताई माळी मैफीलीचे अध्यक्ष गझलकार अनिल नाटेकर उपस्थित होते.
दरम्यान प्रकाशदादांच्या आठवणी, जयश्री माजगावकर लिखित आठवण हा चारोळी संग्रह प्रकाशित झाला. आणि रंगत गेली ती काव्यमैफिल नवनाथ खरात,आत्माराम हरे, प्रकाश सकुंडे, मंगेश म्हात्रे, अविनाश चव्हाण, चंद्रकांत जोगदंड, स्वाती राऊत, प्रतिक्षा कांबळे, पोपट वाबळे, औंदुबर भोसले, आकाश आढाव,करूणा कंद, प्रज्ञा ढमाळ, राणी कोकाटे, सुभाष वाघमारे, विजयसिंह घाडगे, अमोल गुरगुडे, हरिश्चंद्र दळवी, श्रेयस सनगरे, अरूणा शेलार, धनश्री गदादे, नितीन लोंढे, सुमय्या भिसे , सुमित वाघमारे, अशोक शिंदे,संजय भोंग, माधुरी वानखेडे, रविंद्र तनपुरे, जयंत पाटील हे निमंत्रित कवी कवयित्री ची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गझलकारा कविता काळे यांनी केले व आभार प्रदर्शन स्वागताध्यक्ष बापूसाहेब भोंग यांनी केले .