इंडसइंड बँकेत मातृ दिन साजरा

इंडसइंड बँकेत मातृ दिन साजरा  करताना अधिकारी व

 कर्मचारी
बारामती: 
सोमवार दि.०९ मे  रोजी बारामती येथे इंडसइंड बॅंक बारामती शाखेत मातृ दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नुकत्याच दक्षिण आफ्रिका येथे पार पडलेल्या आयर्न मॅन स्पर्धमध्ये विक्रम नोंदविलेला कु. अभिषेक ननवरे यांच्या मातोश्री सौ.सपना ननवरे  यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी  सौ. विजया माने, सौ. मंजुषा शहा, सौ. शोभा मांगले, सौ.सोनल क्षिरसागर , सौ. राजश्री आगम, सौ. सपणा ताकमुके  उपस्थित होत्या. 
जिद्द चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर कमी वयात बारामती चा पहिला आर्यमॅन होण्यासाठी अभिषेक यास प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या मातोश्री चा सत्कार म्हणजे मातृ दिन सार्थक झाला असल्याचे शाखाधिकारी किरण फडतरे यांनी सांगितले.
बँके च्या वतीने मातृ दीना निमित्त विविध योजना असून त्याचा लाभ घेण्याचे आव्हान  करण्यात आले 

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!