अनंत फ्लोअर गार्डन मुळे बारामती च्या सौन्दर्य मध्ये भर: अजित पवार

आनंत फ्लोअर गार्डन चे उदघाटन करताना अजित पवार व सोबत  नगरसेवक जय पाटील व इतर

बारामती:
हरित बारामती सुंदर बारामती करताना व पर्यावरणाचा समतोल राखताना आनंत फ्लोअर गार्डन मुळे बारामती च्या वैभवात व सौन्दर्य मध्ये  भर  पडणार आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
शनिवार ०७ मे रोजी माऊलीनगर  येथे  नगरसेवक जय पाटील यांच्या प्रत्यनातून व लोक सहभागातून  साकारलेले आनंत फ्लोअर गार्डन चा लोकार्पण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला या वेळी पवार बोलत होते 
या प्रसंगी माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,गटनेते सचिन सातव,नगरसेविका अनिता माने,शारदा मोकाशी,शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर,तालुका राष्ट्रवादी चे अध्यक्ष संभाजी होळकर ,मुखधिकारी महेश रोकडे व सर्व नगरसेवक,नगरसेविका ,विविध विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्तीत होते.
बारामती तालुक्यातील विविध विकास कामाचा आढावा घेऊन ,उद्याने शहरामधील अत्यावश्यक भाग असून त्याचा विकास करण्यासाठी नगरपरिषद ने पुढाकार घ्यावा व स्थानिकांनी देखभाल साठी सहकार्य करावे व या बागेचा आदर्श इतरांनी घ्यावा  असेही पवार यांनी सांगितले.

१५ गुंठ्याच्या ओपन स्पेस मध्ये दीड हजार च्या आसपास देशी फुले देणारी,दिवसा व रात्री फुलणारी,सुगंध देणारी फुलझाडे असून सोनचाफा,बकुळ,मोगरा,कामिनी,सोनटक्का,चाफा,आदी देशी फुलझाडे असून युवक व ज्येष्ठ नागरिकां व्यायाम करण्यासाठी ओपन जिम सुद्धा करण्यात आली असून बारामती तालुक्यातील पहिली फुलांची बाग माऊली नगर मध्ये सर्व नागरिकांच्या सहकार्याने साकारली असल्याचे  नगरसेवक जय पाटील यांनी प्रास्ताविक मध्ये  सांगितले.

या प्रसंगी कमला नेहरू सोसायटी च्या  चेअरमन पदी दिगंबर पाटील व व्हाईस चेअरमन पदी पुरोषत्तम कदम  यांची निवड झाल्याबद्दल व फ्लोअर गार्डन तयार करताना विशेष योगदान दिल्याबद्दल अमोल क्षीरसागर यांचा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . नगरसेवक जय पाटील यांनी स्वखर्चातून सदर बाग तयार करून  नागरिकांसाठी खुली केली या बदल समस्त माऊली नगर च्या नागरिकांच्या वतीने अजित पवार यांच्या शुभहस्ते जय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार ऍड रमेश कोकरे यांनी मानले 

  
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!