बारामती:
बारामती तालुक्यातील ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कूल मधील इयत्ता 7वी मध्ये* शिकणारी विद्यार्थिनी संस्कृती प्रवीण झगडे हिने बी.जे.वाय.एम. पुणे आयोजित कराटे चॅम्पयनशिप स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून ज्ञानसागरच्या यशामध्ये आणखी मानाचा तुरा रोवला.तसेच मुलींनीसुद्धा स्वसंरक्षणासाठी कराटे सारखे प्रशिक्षण घ्यावे.
तसेच सदर स्पर्धेमध्ये उत्तुंग यश संपादन केल्यामुळे संस्थेचे प्रमुख सागर आटोळे यांनी सुद्धा कौतुकाची थाप म्हणून ट्रॉफी व गुच्छ देऊन तिचा गौरव केला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे ,दिपक सांगळे, पल्लवी सांगळे, दिपक बिबे, सीईओ संपत जायपात्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, निलिमा देवकाते,स्वप्नाली दिवेकर, राधा नाळे या सर्व अभिनंदन केले.