श्री भिवाईदेवी जीर्णोद्धार व कलशारोहण कार्यक्रम
ऐतिहासिक वारसा असलेल्या फलटण शहरापासून उत्तरेला सात किलोमीटर अंतरावर नीरा नदीच्या पात्रात महाकाय दगडावरअसलेले जागृत व नवसाला पावणारी देवस्थान म्हणजे श्री भिवाई देवी देवस्थान होयया देवस्थानाचा जीर्णोद्धार व कलाशारोहण समारंभ गुरुवार दिनांक ०५/०५/२०२२ व शुक्रवार दिनांक ०६/०५/२०२२ रोजी संपन्न होणार आहे
सुरुवातीला लोकवर्गणीतून भव्य असा सभामंडप बांधण्यात आला खडकामध्ये सिमेंट रस्ता करण्यात आला त्यानंतर फलटण तालुक्याचे भाग्यविधाते व विधान परिषदेचे सभापती मा.ना. श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर, फलटण तालुका बाजार समितीचे सभापती मा.श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व
सहकार्याने देवस्थानाची विविध विकास कामांना सुरुवात झाली.मा.ना. श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांनी या देवस्थानाला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. त्यानंतर आदरणीय महाराज साहेबांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून दिला.
याकामीमा.ना. श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर,मा.आ. दिपकराव चव्हाण, मा. श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर,मा. श्रीमंत संजीवराजे ना.निंबाळकर,मा. शंकरराव माडकर या सर्वांनी या देवस्थानाला सतत सहकार्य केले. १ मार्च २०१९ रोजी श्री भिवाईदेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार कामाची सुरुवात सातारा जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या शुभहस्ते व तसेच फलटण कोरेगाव मतदार संघाचे आ. श्री दिपकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मंदिराचा भव्य असून याकामी मंदिरासाठी कोल्हापूरहून दगड आणण्यात आले आहे. मंदिराच्या चौकात तिरुपती बालाजी येथून आणण्यात आल्या आहेत. मंदिराला दगडी घुमट बांधण्यात आला आहे. मंदिरा साठी लागणारी परळी वैजनाथ येथून आणण्यात आली आहे.मंदिराची एकूण उंची ७१ फुट असून, सोन्याचा मुलामा दिलेला सव्वाचार फूट उंचीचा आहे. कळसाला ३२ तोळे सोन्याचा मुलामा केलेला
आहे. मंदिराला एकूण खर्च एक कोटीच्या आसपास आला असून हा सर्व खर्च भाविकांच्या लोकसहभागातून करण्यात आला आहे.
तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे अवाहन श्री भिवाई देवी ट्रस्ट कांबळेश्वर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.