उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा हॉकी ओलंपियन राहुल सिंग व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत समारोप समारंभ संपन्न

 फलटण : फलटण टुडे
फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती मार्फत 15 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2022 या दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच या शिबीराचा समारोप समारंभ श्रीमंत शिवाजीराजे क्रीडांगण (घडसोली मैदान) फलटण येथे संपन्न झाला. 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 1996 अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले श्री राहुल सिंग यांच्या उपस्थितीमध्ये थाटात संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खो-खो असोशीएशन चे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांनी खेळाडूंना या प्रशिक्षण शिबिरातून विद्यार्थ्यांना मैदानाची व खेळाची आवड नक्कीच निर्माण झाली असेल असे सांगून या शिबिराचा असाच उपक्रम पुढच्या काळात चालू ठेऊन अशाच पद्धतीने दररोज सराव करून आपल्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवावे असे आवाहन केले तसेच फलटण मध्ये इथून पुढच्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान (astroturf) लवकरात लवकर तयार करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत असे सांगितले.

 सुरुवातीलाच त्यांनी क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे साहेब यांचा आवर्जून उल्लेख केला . ते फुटबॉल ,हॉकी या दोन खेळांमध्ये तरबेज होते असे सांगितले  त्यांच्या बरोबरआम्हीदेखील फुटबॉल हा खेळ खेळत होतो, असे सांगून आत्ता वयाच्या ऐंशीव्या वर्षी देखील तेवढ्याच जोमाने ते क्रीडाक्षेत्र पाहत आहेत असा उल्लेख त्यांनी केला.


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  राहुल सिंग यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना फलटण सारख्या ठिकाणी एवढे खेळाडू विविध खेळांमध्ये सहभाग घेतात हे पाहून मला खूप आनंद झाला आहे असे म्हटले तसेच खेळांमध्ये सातत्य असणे फार गरजेचे आहे, त्याचप्रमाणे फलटण शहरामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू सहभागी होतात परंतु जर फलटणमध्ये भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान असणे गरजेचे आहे असे म्हटले तसेच त्यांनी फलटणच्या हॉकी खेळाडूंना पद्मश्री  धनराज पिल्ले सर यांना घेऊन मी या खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे असे देखील मत व्यक्त केले.

या समारोप समारंभासाठी तालुका क्रीडा अधिकारी  महेश खुटाळे, प्रशासन अधिकारी  अरविंद निकम सर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य  गंगवणे बी. एम, उपप्राचार्य  ननवरे ए.वाय., ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य  फडतरे सर, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या दिक्षित मॅडम, नसरीन मॅडम, क्रीडा समितीचे सदस्य  महादेव माने , सीनियर हॉकी खेळाडू  महेंद्र जाधव,  सुजित निंबाळकर,  प्रवीण खाडे,  सुमित मोहिते, सचिन लाळगे, व क्रीडा समितीचे सर्व सदस्य  उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा समितीचे सदस्य  तुषार मोहिते सर यांनी केले. प्रास्ताविक क्रीडा समितीचे चेअरमन  शिवाजीराव घोरपडे साहेब यांनी केले प्रास्ताविकामध्ये घोरपडे साहेबांनी या शिबिराची सर्व माहिती सांगितली व विविध खेळांमध्ये कोणकोणत्या क्रीडा  मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले याची देखील माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हॉकी ओलंपियन खेळाडू  राहुल सिंग यांचा परिचय क्रीडा समितीचे सचिव सचिन धुमाळ यांनी करून दिला.


त्यानंतर शिबिरार्थी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले तसेच शिबिरार्थी विद्यार्थ्यांची मनोगते घेण्यात आली. 15 दिवसाच्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये  खो-खो चे राष्ट्रीय प्रशिक्षक श्री प्रशांत पवार सर, ऍथलेटिक्स या खेळासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक श्री राजगुरू कोथळे सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच या शिबिरा ला आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू कुमारी अक्षदा ढेकळे व वैष्णवी फाळके यांनी देखील भेट देऊन सर्व खेळाडूंना मार्गदर्शन दिले.

या कार्यक्रमाचे आभार क्रीडा समितीचे सदस्य प्रा. श्री तायाप्पा शेडगे सर यांनी केले.  आभारा मध्ये  माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे हे शिबिर यशस्वी पार पडता आले म्हणून त्यांचे विशेष आभार मानले तसेच हॉकी ऑलिंपियन राहुल सिंग यांनी वेळात वेळ काढून या समारोप समारंभासाठी उपस्थित राहून खेळाडूंना मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे देखील आभार मानले .

 त्याचप्रमाणे मुधोजी हायस्कूल चे प्राचार्य श्री गंगवणे बी .एम. यांनी शिबिरासाठी लागणारे मैदान व्यवस्थित तयार करून दिल्याबद्दल व वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे देखील आभार मानले. आभार प्रदर्शनानंतर सर्व उपस्थित मान्यवरांसोबत शिबिरार्थी खेळाडूंचा खेळानुसार फोटो सेशन घेण्यात आला व उपस्थित सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

हे शिबिर पंधरा दिवस यशस्वी रित्या पार पडण्यासाठी  संजय फडतरे, प्रा.श्री स्वप्नील पाटील सर , राज जाधव, खुरंगे बी.बी,   शिंदे वि. जी ,  बोराटे सर, सुळ सर,  जाधव डि. एन,  पवार सर,  वाघमोडे सर,  घोरपडे सर,  धनश्री क्षीरसागर मॅडम, अमित काळे, अविनाश  गंगतीरे, गव्हाणे मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!