आसू ( फलटण टुडे ):
हणमंतवाडी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसने (राजे गट ) हणमंतवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. हणमंतवाडी येथील सोसायटी बऱ्याच वर्षानंतर बिनविरोध झाली यावेळी चेअरमन व व्हा चेअरमन निवडी सुद्धा बिनविरोध झाऱ्या .
चेअरमन पदी राजकुमार जयवंत साबळे तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रकांत दादासो शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळ निवडणूक निर्णय अधिकारी शेखर साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली गेली.
या प्रसंगी नवनियुक्त संचालक श्री विक्रमसिंह बाळासाहेब जाधव, श्री दत्तात्रय गणपत पवार, श्री बाळासो शिवाजी कदम, श्री धनाजी सर्जेराव गायकवाड, श्री दिलीप रघुनाथ गायकवाड, श्री बाळासो महादेव शिंदे, सौ रिटा दादासो पवार, सौ बाळूबाई जयवंत मुळीक, श्री दत्तात्रय उमाजी निकाळजे, श्री व्यंकट परबती पवार, श्री राहुल महादेव बनसोडे उपस्थित होते. राजेंद्र हरिभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या सोसायटीने उत्तरोत्तर प्रगती केली आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सभापती विधानपरिषद महाराष्ट्र राज्य. आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा. यांनी नवनिर्वाचीत सदस्यांचे अभिनंदन केले.