तालुक्यातील सरडे गावामधील सर्वसामान्य असणार्या धायगुडे कुटुंबातील वैभव बाजीराव धायगुडे याने MPSC म्हणजेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने सन २०२० साली घेण्यात आलेल्या परिक्षेत संपुर्ण राज्यामध्ये १४ वा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याच्यावर फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वैभव धायगुडेचे प्राथमिक शिक्षण हे फलटण येथील कमला निमकर बालभवन येथे संपन्न झाले. तर माध्यमिक शिक्षण हे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे पुर्ण केले. त्यानंतर अभियांत्रिकी शिक्षण हे पुणे येथील मॉडर्न कॉलेज येथे पुर्ण केले.
वैभव धायगुडेचे वडील हे निवृत्त शिक्षक असुन सध्या ते शेती करत आहेत. तर आई ही गृहीणी आहे.