बारामती:
बारामती एमआयडीसी येथील संजिवनी ग्रुप च्या वतीने तालुक्यातील विविध गावा मध्ये होत असलेल्या जत्रे साठी मोफत पाण्याचे टँकर ने पाणी पुरवठा केला जात आहे याचा शुभारंभ बाबूर्डी येथे करण्यात आला
या वेळी सरपंच ज्ञानेश्वर पोमने,
ओ बीसी सेल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तात्यासाहेब देठे, पोलीस उपनिरीक्षक महेश पोमने,व संजीवनी ग्रुप चे संचालक सचिन शाहीर व दीपक शाहीर आणि ग्रामस्थ उपस्तीत होते
संजीवनी ग्रुप च्या वतीने गेल्या दहा वर्षा पासून विविध गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार जत्रे मधील ग्रामस्थ व पाहुणे मंडळी साठी पिण्याचे पाणी टँकर च्या माध्यमातून मोफत दिले जाते या वर्षी सुद्धा बाबूर्डी,मासाळवाडी,जोगवडी आदी गावा मध्ये टँकर पुरविले जात असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार सामाजिक बांधिलकी म्हणून व जत्रे मध्ये तात्पुरती लोकसंख्या वाढत असते म्हणून सदर टँकर पुरविले जाणार असून इच्छुक ग्रामस्थांनी संपर्क साधावा असे आव्हान संजविनी ग्रुप चे संचालक व ओबीसी सेल चे राज्य कार्याध्यक्ष सचिन शाहीर यांनी केले