*
सातारा दि. 22 : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी शिष्यवृत्ती/शिक्षण फी परिक्षा फी या योजनेचे अनुसूचित जाती, विजाभज ,इमाव व विमाप्र प्रवर्गातील
अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरण (Renewal) अर्ज व नवीन अर्ज नोंदणी
करण्याची मुदतवाढ दि. ३० एप्रिल 2022 पर्यंत देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त नितिन उबाळे यांनी दिली.
महाविद्यालय स्तरावर अनु जातीचे १२८७ आणि इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गाचे २५०९ अर्ज महाविद्यालय स्तरावर अद्यापहीप्रलंबित आहेत. तसेच त्रुटी पुर्ततेसाठी विद्यार्थी स्तरावर अनु जातीचे ६८९ व इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गाचे ११९३ अर्ज प्रलंबित आहेत. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये यास्तव या अर्जावर तात्काळ कार्यवाही करावी व पात्र अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण ,सातारा या कार्यालयाकडे वर्ग करण्याचे आवाहनही श्री. उबाळे यांनी केले आहे.