राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर संकल्प सभेस फलटण – कोरेगाव विधान सभा मतदार संघातून जाणार ५०० गाड्या : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण दि. २१ : तपोवन मैदान, कोल्हापूर येथे शनिवार दि. २३ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात येत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस संकल्प सभेस फलटण – कोरेगाव विधान सभा मतदार संघातून ५०० गाड्यांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस संकल्प सभेस फलटण तालुक्यातून जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित रहावेत याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या येथील लक्ष्मी – विलास पॅलेस या निवासस्थानी आयोजित बैठकीत याबाबत नियोजन करण्यात आले. त्यावेळी आ. दीपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, संतकृपा उद्योग समुहाचे विलासराव नलवडे, लायन उप प्रांतपाल MJF लायन भोजराज नाईक निंबाळकर, मोहनराव नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे व सौ. प्रतिभाताई धुमाळ, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरदराव पवार, महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राज्य मंत्री मंडळातील राष्ट्रवादीचे सर्व मंत्रीगण, राष्ट्रावादीचे सर्व खासदार, आमदार, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे पदाधिकारी सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, विकास सोसायट्यांचे चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते या संकल्प सभेस उपस्थित राहणार असल्याचे यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
शनिवार दि. २३ रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत कोल्हापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस संकल्प सभेस जाणारी फलटण तालुक्यातील सर्व वाहने श्री दिवाकर निंबाळकर, आदरकी यांच्या पेट्रोल पंपावर एकत्र येतील तेथे सर्व वाहनांची नोंदणी केल्यानंतर सर्व वाहने कोल्हापूर कडे रवाना होतील असे नियोजन करण्यात आले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!